मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar : शरद पवारांनी बारा वर्षानंतर लालबाग राजाच्या चरणी घेतले दर्शन

Sharad Pawar News : शरद पवार, जावई आणि नात यांच्यासोबत लालबाग राजाच्या दर्शनाला, कोरोना काळात रक्तदान शिबिराला लावली होती हजेरी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sharad Pawar : शरद पवारांनी बारा वर्षानंतर लालबाग राजाच्या चरणी घेतले दर्शन

Sharad Pawar News : शरद पवार, जावई आणि नात यांच्यासोबत लालबाग राजाच्या दर्शनाला, कोरोना काळात रक्तदान शिबिराला लावली होती हजेरी

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी सोमवारी (09 सप्टेंबर ) आपले जावई व नातीसह लालबागच्या राजाचे Lalbaug Cha Raja दर्शन घेतले. पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Maharashtra CM असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते त्यांच्या चरणी लीन झाले हे विशेष.कोरोना महामारीच्या काळात लालबाग राजाच्या मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवारांनी या शिबिराला भेट दिली होती. पण त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. तेव्हा फक्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या भक्तीरसात आकंठ बुडालेत. मुंबईतही विविध गणेश मंडळांच्या गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. विशेषतः लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. त्यातच शरद पवार सोमवारी सकाळी आपले जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवारांनी लालबागच्या राजाकडे कोणते साकडे घातले असेल? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

शरद पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले.

हेही वाचा: MLA Gopaldas Agrawal : "मला पक्ष सोडण्यास भाग पाडले जात आहे…, गोपालदास अग्रवाल यांनी दिला भाजपचा राजीनामा, काँग्रेसमध्ये जाणार

हेही वाचा: Sanjay Raut : संजय राऊत यांचा शिवसेना शिंदे गटावर मोठा आरोप, 'एकीकडे त्यांचे आमदार बुरखे घालतात तर दुसरीकडे…'

शेअर करा