मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Govandi Wanted Criminal : गोवंडी पोलिसांची 'वॉन्टेड' आरोपींवर सर्जिकल स्ट्राईक! 'खुनाच्या प्रयत्ना'तील दोन सराईत फरारी अखेर गजाआड

• Govandi Wanted Criminal Arrested : न्यायालयात हजर न राहिल्याने जारी झाले होते अजामीनपात्र वॉरंट; तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे दोघांनाही बेड्या

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

•Govandi Wanted Criminal Arrested : न्यायालयात हजर न राहिल्याने जारी झाले होते अजामीनपात्र वॉरंट; तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे दोघांनाही बेड्या

मुंबई, गोवंडी :- न्यायालयीन प्रक्रियेला फाटा देत सत्र न्यायालयाच्या सुनावणीस वारंवार दांडी मारणाऱ्या 'खुनाच्या प्रयत्न' (कलम 307) गुन्ह्यातील दोन वॉरंटेड आरोपींना गोवंडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी झाल्यानंतर गोवंडी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि या फरार आरोपींना जेरबंद केले.

गोवंडी पोलीस ठाणे अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील हे दोन्ही आरोपी, कुणाल पांडुरंग कांबळे आणि विशाल राजू गायकवाड, जामिनावर असतानाही कोर्टात हजर राहत नव्हते.

वॉरंट प्राप्त होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील वॉरंट बजावणी पथकाने सहाय्यक फौजदार जायभाय, भडवळकर, पोलीस हवालदार बोराटे अत्यंत गुप्तपणे तपास सुरू केला. पथकाने तांत्रिक मदतीच्या आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सापळा रचून या दोन्ही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातूनच ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना तात्काळ न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, गोवंडी पोलिसांनी सराईत वॉरंटेड आरोपींना पकडून न्यायव्यवस्थेप्रती आपली तत्परता दाखवली आहे.

शेअर करा