मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Gopichand Padalkar: मर्यादा ओलांडल्या! भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका

Gopichand Padalkar: ‘जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही!’ पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य

V
Vivek

1 मिनिट वाचन

Gopichand Padalkar: मर्यादा ओलांडल्या! भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका

Gopichand Padalkar: ‘जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही!’ पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य

सांगली :- महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये विरोधकांवर टीका करताना काही मर्यादा पाळल्या जातात, अशी परंपरा आहे. मात्र, भाजप आमदार गोपीचंद पडळकरGopichand Padalkar यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील Jayant Patil यांच्यावर टीका करताना सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले आहे. सांगली जिल्ह्यातील जत येथे बोलताना पडळकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर थेट आरोप केला की, त्यांनी एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. "याने महाराष्ट्र कसा चालवला? जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या टीकेची सुरुवात केली.

‘राजारामबापूंची औलाद वाटत नाही’

पडळकर यांनी आपल्या भाषणात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. "जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील, तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का, हे पाहण्यासाठी जयंत पाटलांनी जतमध्ये माणसे पाठवली," असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर "पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही," असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले. तसेच, "हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे, काहीतरी गडबड आहे," असे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद सातत्याने चर्चेत असतो. याआधीही त्यांनी अनेकदा एकमेकांवर टीका केली आहे, पण जतमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे या वादामध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

शेअर करा