मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Gokul News : 'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय घडामोडींना वेग; 14 सदस्यांच्या कोरमवर सभेचे भवितव्य अवलंबून!

• Gokul Milk Union Chairman Election " सतेज पाटील गटाचे संचालक बैठकीसाठी रवाना; महायुतीच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Gokul News : 'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय घडामोडींना वेग; 14 सदस्यांच्या कोरमवर सभेचे भवितव्य अवलंबून!

•Gokul Milk Union Chairman Election "सतेज पाटील गटाचे संचालक बैठकीसाठी रवाना; महायुतीच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

कोल्हापूर :- जिल्ह्याची अत्यंत महत्त्वाची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाच्या नव्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. संघाच्या अध्यक्षनिवडीसाठी आज विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेचे कामकाज पार पाडण्यासाठी किमान १४ संचालकांचा 'कोरम' (गणसंख्या) पूर्ण होणे अत्यंत अनिवार्य आहे. जर हा आवश्यक कोरम पूर्ण झाला नाही, तर सभा तहकूब करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या महत्त्वाच्या घडामोडीमुळे कोल्हापूरच्या राजकारणात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे सर्व संचालक एकत्र येऊन बैठकीसाठी आणि गोकुळ कार्यालयाकडे मार्गस्थ झाले आहेत. मात्र, दुसरीकडे महायुतीच्या संचालकांनी आपली अधिकृत भूमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली असल्यामुळे सभेचा कोरम पूर्ण होणार का, याबद्दल साशंकता कायम आहे.

लोकशाही संपवण्याचे प्रकार सुरू असल्याचा सतेज पाटील यांचा आरोप

या निवड प्रक्रियेबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'गोकुळ'च्या निवडणुकीत कोरमचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करू नये, यासाठी आपण पालकमंत्री प्रकाश आबीटकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील आणि आमदार विनय कोरे यांना फोनवरून विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शासन नियुक्त किंवा तज्ज्ञ संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास ती लोकशाहीची पायमल्ली ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोकुळच्या अध्यक्षपदी नेमकी कोणती राजकीय व्यक्ती विराजमान होणार आणि महायुतीचे संचालक या सभेला उपस्थित राहून नेमकी काय भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: Pimpri-Chinchwad Fire News : पिंपरी-चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 17 दुचाकी आणि 4 चारचाकी वाहने जळून खाक

शेअर करा