मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pimpri-Chinchwad Fire News : पिंपरी-चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 17 दुचाकी आणि 4 चारचाकी वाहने जळून खाक

•" मध्यरात्री लागलेल्या आगीत एकाची प्रकृती जखमी; अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले नागरिकांचे प्राण!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pimpri-Chinchwad Fire News : पिंपरी-चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 17 दुचाकी आणि 4 चारचाकी वाहने जळून खाक

•"मध्यरात्री लागलेल्या आगीत एकाची प्रकृती जखमी; अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले नागरिकांचे प्राण!"

पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड शहरातून एक मोठी आणि थरारक दुर्घटना समोर आली आहे. चापेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंग क्षेत्रात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एक भीषण आग भडकली. या दुर्घटनेत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तब्बल 17 दुचाकी (टू-व्हीलर) आणि 4 चारचाकी (फोर-व्हीलर) वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, ही सर्व वाहने आगीत जळून पूर्णपणे खाक झाली आहेत. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात मोठी तारांबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या या आगीने अत्यंत रौद्ररूप धारण केले होते. आगीचे मोठे लोळ आणि धुराचे काळे लोट दूरवर पसरल्याचे पाहायला मिळाले. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलास याची माहिती दिली.

अग्निशमन दलाची धाडसी कारवाई; इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका

मुख्य अग्निशमन केंद्राला रात्री 1 वाजून 59 मिनिटांनी या आगीबाबतचा कॉल प्राप्त झाला. माहिती मिळताच प्राधिकरणाचे उपअग्निशमन केंद्र आणि थेरगाव उपअग्निशमन केंद्राची वाहने व जवानांचे पथक अवघ्या काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, आग लागलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही नागरिक अडकल्याची माहिती मिळताच जवानांनी जिवाची पर्वा न करता वरच्या मजल्यावर धाव घेतली आणि सर्व नागरिकांना सुखरूप खाली सुटका केली. जवानांच्या या धाडसी आणि यशस्वी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा ई-वेहिकलमधील बिघाडामुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवला जात असून पोलीस व अग्निशमन दल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

हेही वाचा: MLC Election Result 2026 : महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय; 5 पैकी 3 जागांवर मविआचा झेंडा!

शेअर करा