Kohlapur News : कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणूकीत समविचारी पॅनलची एकहाती सत्ता
Kohlapur News : कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल अखेर हाती आले असून, यामध्ये आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनलने जोरदार मुसंडी मारत १४ विरुद्ध ११
2 मिनिट वाचन

Kohlapur News : आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा १४ विरुद्ध ११ जागा मिळवून ऐतिहासिक विजय; महायुतीच्या सर्व दिग्गज नेत्यांची ताकद पणाला लावूनही पाटील यांनी दिली एकाकी झुंज
Kohlapur News : कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल अखेर हाती आले असून, यामध्ये आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनलने जोरदार मुसंडी मारत १४ विरुद्ध ११ अशा फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
महायुतीच्या सर्व दिग्गज नेत्यांची ताकद एका बाजूला आणि सतेज पाटील यांची एकाकी झुंज दुसऱ्या बाजूला, अशा अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत अखेर सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये एकहाती सत्ता खेचून आणली आहे. विजयाची औपचारिकता उरताच कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी जोरदार आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात अभूतपूर्व जल्लोष साजरा केला.
एकतर्फी विजय मिळवू असा महायुतीच्या नेत्यांचा होता दावा
\
या निवडणुकीत महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. भाजपचे नेते व खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रदीप नरके यांच्यासह महायुतीमधील अनेक दिग्गज नेते आणि खुद्द प्रकाश आंबेडकर यांचा गटसुद्धा महायुतीसोबत जोडला गेला होता. महायुतीच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात जोरदार प्रचार करण्यात आला होता, ठरावधारकांना सहलीवर व हॉटेलमध्ये नेण्यात आले होते, तसेच 'गोकुळ'वर २५-० असा एकतर्फी विजय मिळवून आमचीच सत्ता येणार असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात होता. मात्र, या सर्वांच्या विरोधात सतेज पाटील यांनी एकट्याने किल्ला लढवत संपूर्ण जिल्ह्यात जोरदार प्रचार मोहीम राबवली होती.
दुपारी बारा वाजेपर्यंत महायुतीचे उमेदवार आघाडीवर
मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले होते आणि दुपारी बारा वाजेपर्यंत महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र, जसजसे दुपारी एक वाजेनंतर अंतिम मतमोजणीचे निकाल समोर येऊ लागले, तसतसे चित्र बदलू लागले. सतेज पाटील यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी एकापाठोपाठ एक आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली. अखेरच्या टप्प्यात चुरशीच्या लढतीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने १४ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर महायुतीला ११ जागांवर समाधान मानावे लागले.
मोठे आणि धक्कादायक निकाल
या निवडणुकीत काही मोठे आणि धक्कादायक निकालही पाहायला मिळाले. अनेक वर्षांपासून गोकुळमध्ये संचालक व अध्यक्ष राहिलेले विश्वास आबाजी पाटील, तसेच अरुण नरके आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांना पराभवाचा सामना करावा लागला. दिग्गजांच्या पराभवामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती आणि मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे पूर्ण प्रयत्न केले होते. मात्र, कोल्हापूरच्या सुजाण ठरावधारकांनी आणि दूध उत्पादकांनी नेत्यांच्या दबावाला न जुमानता सतेज पाटील यांच्या पारड्यात आपले मत टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूरच्या राजकारणात अशी एक म्हण आहे की, ज्याची गोकुळवर सत्ता असते, त्याचे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर नियंत्रण असते. त्यामुळे या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीपूर्वीच सतेज पाटील यांनी गोकुळचे संस्थापक चेअरमन यांच्या चिरंजीवांचे नाव पहिल्या चेअरमन पदासाठी घोषित केले होते, त्यामुळे आता आगामी काळात गोकुळचे नवीन अध्यक्ष म्हणून शशिकांत पाटील शिपेकर यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक वेगाने सुरू आहे. गोकुळच्या या ऐतिहासिक विजयाने कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील यांचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून, संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.




