मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kohlapur News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलची बाजी; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी नवा पेच

Kohlapur News :कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने विजय मिळवला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलची बाजी; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी नवा पेच
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलची बाजी; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी नवा पेच

Kohlapur News :कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने विजय मिळवला आहे. २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवत या आघाडीने बहुमताचा आकडा गाठला. मात्र, या विजयानंतरही गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून नवा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News

चेअरमनपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग
गोकुळमध्ये सत्ता आल्यास शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्यक्षपदाची संधी दिली जाईल, असा शब्द सतेज पाटील यांनी दिल्याची चर्चा आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वीच राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आता गोकुळचा नवा चेअरमन कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होणार
गोकुळच्या निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीच्या नेत्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पराभवाची कारणे तपासण्यासोबतच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही, यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी ५,४०० ठरावधारक मतदारांपैकी बहुसंख्य मतदार आपल्या बाजूने असल्याचा दावा केला होता. तसेच २५-० अशा विजयाचे भाकीतही केले होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला.

कोरमचा तांत्रिक पेच; सतेज पाटील यांची डोकेदुखी वाढणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेल्या कोरमचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सभेचे कामकाज पार पाडण्यासाठी १४ सदस्यांचा कोरम आवश्यक असल्याने विरोधकांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महायुतीने आपल्या सदस्यांना तटस्थ ठेवले किंवा सभेला अनुपस्थित राहण्याची भूमिका घेतली, तर अध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १३ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या सतेज पाटील यांच्या गटासमोर नवे आव्हान उभे राहू शकते.

गोकुळच्या सत्तासंघर्षात पुढे काय होणार?
एकीकडे निवडणुकीतील विजयामुळे समविचारी आघाडीचे पारडे जड झाले असले, तरी अध्यक्षपदाच्या निवडीतील संभाव्य तांत्रिक पेचामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो आणि सतेज पाटील यांचा गट या परिस्थितीतून कसा मार्ग काढतो, यावर गोकुळच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता कोणती राजकीय खेळी रंगणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा