मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ghatkopar hoarding collapse: घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यू पडलेलाच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर

Ghatkopar hoarding collapse : मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ghatkopar hoarding collapse: घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यू पडलेलाच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर

Ghatkopar hoarding collapse : मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे

मुंबई :- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत Ghatkopar hoarding collapse 8 जणांचा मृत्यू 8 people Died झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई आणि परिसरात अचानक आलेल्या वादळी-वाऱ्यामुळे घाटकोपरच्या छेडा नगर Cheda Nagar येथील महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर Petrol Pump कोसळलं होतं. ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने अनेक वाहने होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकली.

पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेले होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. CM Eknath Shinde Reaction On Ghatkopar hoarding collapse

मिळालेल्या माहितीनुसार, होर्डिंग कोसळलं त्यावेळी पेट्रोल पंपावर अनेक वाहने होती. जवळपास 100 जण या होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे. आतापर्यंत 54 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना जवळील राजावाडी आणि इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. CM Eknath Shinde Reaction On Ghatkopar hoarding collapse

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 57 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख देण्याचे जाहीर केले असून जखमींवर सरकारी खर्चाने सर्व उपचार करण्यात येतील. तसेच अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. CM Eknath Shinde Reaction On Ghatkopar hoarding collapse

शेअर करा