मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Gas Cylinder : गॅस टंचाईचे संकट गडद! मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ? "आता चूल पेटवायची वेळ येणार का?" सतेज पाटलांचा सरकारला सवाल

Mumbai Gas Cylinder News : इराण-इस्रायल युद्धाचा फटका; व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबवल्याने हॉटेल उद्योग संकटात, घरगुती गॅसबाबतही धाकधूक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Gas Cylinder : गॅस टंचाईचे संकट गडद! मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ? "आता चूल पेटवायची वेळ येणार का?" सतेज पाटलांचा सरकारला सवाल

Mumbai Gas Cylinder News : इराण-इस्रायल युद्धाचा फटका; व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबवल्याने हॉटेल उद्योग संकटात, घरगुती गॅसबाबतही धाकधूक

मुंबई :- इराण आणि इस्रायलमधील युद्धाचे पडसाद आता थेट भारतीयांच्या स्वयंपाकघरात आणि हॉटेल उद्योगात उमटू लागले आहेत. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक (Commercial) एलपीजी सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील सुमारे 20% हॉटेल्स आज बंद ठेवण्यात आली असून, पुढील तीन दिवसांत ही स्थिती न सुधारल्यास 59% हॉटेल्स बंद होण्याची भीती 'आहार' (AHAR) संघटनेने व्यक्त केली आहे.

"सरकारने सभागृहात सत्य मांडावे" - सतेज पाटील

काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी या संकटावरून सरकारवर सडकून टीका केली आहे. "व्यावसायिक गॅसवर निर्बंध आलेत, आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता आहे. पुन्हा चूल पेटवायची वेळ येणार का? असा प्रश्न जनतेसमोर आहे. ऑईल कंपन्यांकडे कच्चा मालच नसेल तर उत्पादन कसे वाढणार? हे सर्व चुकीच्या परराष्ट्र धोरणाचे परिणाम आहेत," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सरकारने सभागृहात गॅसच्या नेमक्या स्थितीबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हॉटेल आणि मिठाई व्यवसायाला मोठा फटका

मुंबईची स्थिती: 'आहार' संघटनेच्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक हॉटेल्सकडे आज आणि उद्या पुरेल इतकाच गॅस साठा आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास निम्मी हॉटेल्स बंद होतील, ज्याचा फटका तिथे काम करणाऱ्या हजारो कामगारांना बसेल.

पुण्यातील चित्र: प्रसिद्ध 'काका हलवाई' मिठाई दुकानाचे मालक युवराज गाढवे यांनी सांगितले की, गॅसअभावी आता डिझेल किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा पर्याय शोधावा लागत आहे. यामुळे मिठाईच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारचा 'पॅनिक' रोखण्याचा प्रयत्न?

एकीकडे सरकार परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत असले, तरी प्रशासकीय पातळीवर ऑईल कंपन्यांकडून तातडीने माहिती मागवली जात आहे. घरगुती ग्राहकांमध्ये भीती पसरू नये म्हणून सरकारने गॅस बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 25 दिवसांवर नेला आहे. मात्र, मध्यमवर्गीयांना आगामी 8-10 दिवसांत महागाई आणि तुटवड्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेअर करा