मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Gajanan Kale : ठाकरे बंधूंच्या एकतेवर भाजपची पोटदुखी! मनसे नेते गजानन काळेंचा घणाघात : “भाजपला अपचन, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा!”

Gajanan Kale On Ashish Shelar : भाषा की सत्ता?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Gajanan Kale : ठाकरे बंधूंच्या एकतेवर भाजपची पोटदुखी! मनसे नेते गजानन काळेंचा घणाघात : “भाजपला अपचन, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा!”

Gajanan Kale On Ashish Shelar : भाषा की सत्ता? ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप–प्रत्यारोप सुरूच

नवी मुंबई | मुंबईच्या वरळी भागातील एनएससीआय डोम येथे शनिवारी पार पडलेल्या शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. हिंदी सक्तीच्या आदेशावरून महायुती सरकारने घेतलेला माघार निर्णय साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या या विजयी मेळाव्यात एकत्र आलेले ठाकरे बंधू – उद्धव आणि राज ठाकरे – जवळपास दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर झळकले.

या ऐतिहासिक क्षणाने मराठी जनतेत उत्साह संचारला असतानाच, या युतीच्या राजकीय संभावनांवरून विरोधकांची तोंडे उघडली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेसोबत युतीचे संकेत दिले आणि तिथूनच सुरु झाला एक नव्या आरोप-प्रत्यारोपाचा खेळ!

भाजप नेते आशिष शेलार यांनी युतीवर तिखट प्रतिक्रिया देत, “ही युती भाषेसाठी नाही, तर सत्तेसाठी आहे. मुंबईची सत्ता मिळवण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे. भाऊबंदकीचं हे राजकारण आहे,” असे म्हणत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. शेलारांच्या मते, मराठी भाषेच्या मुद्द्याआड निवडणूक गणितं साधण्याचा हा प्रयत्न आहे.

परंतु शेलारांच्या या टीकेला मनसे नेते गजानन काळे यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं —"शेलार मामाला पोटदुखी सुरू झाली आहे. भाजपने पक्ष फोडले, भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करून घेतलं, कुटुंबं फोडली, युती केल्या – ते चालतं. पण मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले की अपचन होतं? अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा!"

काळेंच्या या थेट शब्दांमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू असून, अनेकांनी युतीचं स्वागत करत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

शेअर करा