मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली २७ लाखांचा गंडा

रविवार पेठेतील व्यक्तीची फसवणूक; अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली २७ लाखांचा गंडा

रविवार पेठेतील व्यक्तीची फसवणूक; अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

पुणे: शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ५५ वर्षीय व्यक्तीची २७ लाख ३८ हजार १०० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवार पेठेतील फुलवाला चौक परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठ येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही फसवणूक १ जुलै २०२५ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत करण्यात आली. अज्ञात मोबाईल धारक आणि लिंक धारकांनी फिर्यादीशी संपर्क साधून त्यांना शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही व्यवहारांद्वारे फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.

एकदा विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपींनी फिर्यादीला अधिक गुंतवणुकीस प्रवृत्त केले. आरोपींच्या सांगण्यानुसार, फिर्यादीने वेळोवेळी एकूण २७ लाख ३८ हजार १०० रुपये गुंतवले. मात्र, ही रक्कम परत मिळण्याची वेळ आली असता, आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि शेवटी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.

खडक पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावरील अनोळखी लिंक किंवा गुंतवणुकीच्या प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे.

Fraud of Rs 27 lakhs in the name of investment in the stock market

शेअर करा