मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलीस अधिकारी जाळ्यात

पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; आर्थिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा

PG
Prashik Ghaste

3 मिनिट वाचन

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलीस अधिकारी जाळ्यात

पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; आर्थिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा

तक्रारदाराचा अर्ज त्यांच्या बाजूने निकाली काढणे, गैर-अर्जदारावर कडक कारवाई करणे आणि तक्रारदाराची जमीन त्यांना परत मिळवून देणे, या कामाच्या बदल्यात लाच मागण्यात आली होती

महत्वाचे मुद्दे

  • आर्थिक गुन्हे शाखेच्या महिला ए.पी.आय.सह खासगी इसमाला ठोकल्या बेड्या
  • जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी आणि तक्रार अर्जात मदत करण्यासाठी या महिला अधिकाऱ्याने ३० लाखांची मागणी केली होती
  • या कामासाठी संशयितांनी यापूर्वीच २ लाख रुपये स्वीकारले होते
  • हॉटेल कॉनराडच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारी दुपारी झाली नाट्यमय कारवाई
  • वैशाली मुरलीधर तोटेवार आणि त्यांना साथ देणारा खासगी इसम संभाजी शिवाजी चव्हाण यांना अटक
  • पुणे: पुणे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा एक मोठा चेहरा समोर आला असून, आर्थिक गुन्हे शाखेच्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी आणि तक्रार अर्जात मदत करण्यासाठी या महिला अधिकाऱ्याने ३० लाखांची मागणी केली होती.

    मंगलदास रोडवरील प्रसिद्ध हॉटेल कॉनराडच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारी दुपारी ही नाट्यमय कारवाई करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

    कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा
    वैशाली मुरलीधर तोटेवार (वय ४९, पद- सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर) आणि त्यांना या गैरप्रकारात साथ देणारा खासगी इसम संभाजी शिवाजी चव्हाण (वय ४७, रा. सदाशिव पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आला आहे.

    जमिनीच्या वादातून लाचेचा 'सौदा’
    या प्रकरणातील ५९ वर्षीय तक्रारदाराने पुणे शहराच्या आर्थिक गुन्हे शाखेत एक तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्याकडे होता. तक्रारदाराचा अर्ज त्यांच्या बाजूने निकाली काढणे, गैर-अर्जदारावर कडक कारवाई करणे आणि तक्रारदाराची जमीन त्यांना परत मिळवून देणे, या कामाच्या मोबदल्यात तोटेवार यांनी लाचेची मोठी मागणी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या कामासाठी त्यांनी यापूर्वीच २ लाख रुपये स्वीकारले होते. तरीही त्यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी आणखी ३० लाख रुपयांची मागणी केली.

    सापळा आणि रंगेहाथ कारवाई
    वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने ३० एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. 'एसीबी’ने या तक्रारीची अत्यंत गोपनीयरीत्या पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान तोटेवार यांनी ३० लाखांवरून तडजोड करत २८ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच खासगी इसम संभाजी चव्हाण याने ही लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

    शनिवारी (२ मे) दुपारी १ च्या सुमारास 'एसीबी’च्या पथकाने मंगलदास रोडवरील हॉटेल कॉनराडच्या एन्ट्री गेटसमोर सापळा रचला. तोटेवार यांच्या सांगण्यावरून संभाजी चव्हाण याने तक्रारदाराकडून २८ लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने चव्हाण याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर तातडीने वैशाली तोटेवार यांनाही ताब्यात घेण्यात आले.

    पोलीस दलात खळबळ
    आर्थिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारे मोठी कारवाई झाल्याने पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ आणि सतीश वाळके यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

    'एसीबी’चे नागरिकांना आवाहन
    जर कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तुमचे काम करण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल, तर त्याला बळी न पडता तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. नागरिक पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (९८२३१६७१५४) किंवा अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील (९०२९०३०५३०) यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात. तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

    शेअर करा