मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

खेड तालुक्यात शेतकऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक

बटाटे, वांगी आणि चिकूसह ३.२९ लाखांचा शेतीमाल लाटणारा व्यापारी गजाआड

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

खेड तालुक्यात शेतकऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक

बटाटे, वांगी आणि चिकूसह ३.२९ लाखांचा शेतीमाल लाटणारा व्यापारी गजाआड

पुणे: शेतातील बटाटे, वांगी, चिकू आणि कोथिंबीर यांसह विविध पिकांची लाखो रुपयांची खरेदी करून शेतकऱ्याला त्याचे पैसे न देता आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यात उघडकीस आला आहे.

विश्वास संपादन करून तब्बल ३ लाख २९ हजार ५२५ रुपयांचा शेतीमाल उधारीवर लाटल्याप्रकरणी खेड पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या व्यापाऱ्याने परिसरातील इतरही अनेक शेतकऱ्यांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

याबाबत संतोष लक्ष्मण मलबे (वय ४२, धंदा- शेती, रा. खरपुडी खुर्द, ता. खेड, जि. पुणे) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी व्यापारी अरुण गुलाब जेटगुले (रा. वाणीमळा, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१६(२) आणि ३१८(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २८ जानेवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत वेळोवेळी खरपुडी खुर्द आणि शिरोली परिसरात घडली.

असा केला शेतीमाल खरेदीचा व्यवहार
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष मलबे यांनी त्यांच्या खरपुडी खुर्द येथील स्वतःच्या शेतात आणि शिरोली येथे खंडाने घेतलेल्या किसनराव आनंदराव शिंदे यांच्या शेतात विविध पिकांची लागवड केली होती. आरोपी अरुण जेटगुले याने मलबे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या शेतातून शेतीमाल उधारीवर खरेदी केला:

पैसे न देता शेतकऱ्याला लावला चुना
अशा प्रकारे आरोपीने एकूण ३ लाख ७९ हजार ५२५ रुपयांचा शेतीमाल शेतातून थेट खरेदी केला होता. यापैकी काही अंशतः रक्कम वगळता उर्वरित ३ लाख २९ हजार ५२५ रुपये फिर्यादी शेतकऱ्याला अद्यापपर्यंत दिले नाहीत. संतोष मलबे यांनी पैशांची वारंवार मागणी केली असता, आरोपीने टाळाटाळ करत त्यांचा विश्वासघात केला.

इतर शेतकऱ्यांचीही केली फसवणूक
फिर्यादी संतोष मलबे यांच्याप्रमाणेच आरोपी अरुण जेटगुले याने परिसरातील इतर अनेक शेतकऱ्यांकडूनही त्यांचा शेतीमाल उधारीवर घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कष्टाने पिकवलेल्या मालाचे हक्काचे पैसे मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्याने खेड पोलीस ठाणे गाठून बुधवारी (ता. २०) सायंकाळी रीतसर फिर्याद दिली.

पोलीस उपनिरीक्षक गरड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुणे क्राईम न्यूज

शेअर करा