मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

चिंचवड येथे एमएनजीएलच्या भुमिगत गॅस पाईपलाईनचा मोठा स्फोट

gas line blast

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

चिंचवड येथे एमएनजीएलच्या भुमिगत गॅस पाईपलाईनचा मोठा स्फोट

मोहननगर परिसर हादरला, दुचाकीचालकाच्या छातीवर दगडाचा मार


छत्रपती संभाजी महाराज चौकात लोखंडे हॉस्पीटलकडे जाणार्‍या रस्त्यावर एका मेडीकलसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक रस्त्याखालून प्रचंड धूर येत मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने हादरा बसला आणि जमिनीखालून दगड गोटे उंच उडाले

पिंपरी, एप्रिल ९, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) चिंचवड - मोहननगर येथील भुमिगत गॅस पाईप लाईनमध्ये अचानक स्फोट झाल्याने परिसर हादरला. दगड-गोटे उडाले. एक दगड दुचाकीचालकाच्या छातीवर लागला. सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. दरम्यान, या स्फोटामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी एमएनजीएल कंपनीने मोहननगर परिसरात सर्व मुख्य रस्ते व सोसायट्यांमध्ये जमिनीखालून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम केले आहे. बुधवारी (दि. ८) छत्रपती संभाजी महाराज चौकात लोखंडे हॉस्पीटलकडे जाणार्‍या रस्त्यावर एका मेडीकलसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक रस्त्याखालून प्रचंड धूर येत मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने हादरा बसला आणि जमिनीखालून दगड गोटे उंच उडाले. याचवेळी एक दुचाकीचालक तेथून जात होता. त्याच्या छातीवर एका दगडाचा मार बसला.

सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. स्फोटाच्या जागेवर मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठांची सतत वर्दळ असते. सुदैवाने घटना घडली त्यावेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. एमएनजीएल कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला. या निकृष्ट दर्जाच्या गॅस पाईप लाईनमुळे भविष्यात स्थानिक रहिवाशांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्फोटाची चौकशी करून कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्याकडे केली आहे.

Major explosion in MNGL's underground gas pipeline in Chinchwad

शेअर करा