चिंचवड येथे एमएनजीएलच्या भुमिगत गॅस पाईपलाईनचा मोठा स्फोट
gas line blast
1 मिनट पठन

मोहननगर परिसर हादरला, दुचाकीचालकाच्या छातीवर दगडाचा मार
छत्रपती संभाजी महाराज चौकात लोखंडे हॉस्पीटलकडे जाणार्या रस्त्यावर एका मेडीकलसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक रस्त्याखालून प्रचंड धूर येत मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने हादरा बसला आणि जमिनीखालून दगड गोटे उंच उडाले
पिंपरी, एप्रिल ९, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) चिंचवड - मोहननगर येथील भुमिगत गॅस पाईप लाईनमध्ये अचानक स्फोट झाल्याने परिसर हादरला. दगड-गोटे उडाले. एक दगड दुचाकीचालकाच्या छातीवर लागला. सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. दरम्यान, या स्फोटामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
तस्वीरें · 1/1
Arrow Keys ⟵ ⟶
महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी एमएनजीएल कंपनीने मोहननगर परिसरात सर्व मुख्य रस्ते व सोसायट्यांमध्ये जमिनीखालून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम केले आहे. बुधवारी (दि. ८) छत्रपती संभाजी महाराज चौकात लोखंडे हॉस्पीटलकडे जाणार्या रस्त्यावर एका मेडीकलसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक रस्त्याखालून प्रचंड धूर येत मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने हादरा बसला आणि जमिनीखालून दगड गोटे उंच उडाले. याचवेळी एक दुचाकीचालक तेथून जात होता. त्याच्या छातीवर एका दगडाचा मार बसला.
सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. स्फोटाच्या जागेवर मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठांची सतत वर्दळ असते. सुदैवाने घटना घडली त्यावेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. एमएनजीएल कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला. या निकृष्ट दर्जाच्या गॅस पाईप लाईनमुळे भविष्यात स्थानिक रहिवाशांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्फोटाची चौकशी करून कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्याकडे केली आहे.
Major explosion in MNGL's underground gas pipeline in Chinchwad
