मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

सर्वानी मिळून एकत्र काम केल्यास 'स्वच्छ पुणे, स्वस्थ पुणे' होऊ शकते: महापौर नागपुरे

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 'नदी मोहत्सव २०२६'; नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

सर्वानी मिळून एकत्र काम केल्यास 'स्वच्छ पुणे, स्वस्थ पुणे' होऊ शकते: महापौर नागपुरे

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 'नदी मोहत्सव २०२६'; नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन

निलेश राऊत
पुणे: पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग व पर्यावरण विभागामार्फत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बुधवार (ता. २२ एप्रिल) रोजी शहरस्तरीय नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

विठ्ठल मंदिर, विठ्ठलवाडी, सिंहगड रोड याठिकाणी "नदी महोत्सव २०२६" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर मोहिमेचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सनई- ढोल वादनात वृक्ष जलार्पण, शंखनाद व नदी आरती करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत नदी गीताचे व माहितीपटाचे अनावरण महापौर नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना नागपुरे म्हणाल्या महापालिका आवारात प्लास्टिक बंदी करण्याचे आव्हान प्रशासनास दिले आहे. पर्यावरण संवर्धनाकारीता सर्व स्तरांतून प्रयत्न करणे, प्रदूषणाच्या समस्यांचे निराकरण करताना नागरिकांना पर्याय देखील उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शहरातील विविध प्रकारचे प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने पर्यावरण क्षेत्रार विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, तज्ज्ञ व्यक्ती, स्टार्टअप यांच्या सूचना, अभ्यास प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्व प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमिन आपला ग्रह, आपली उर्जा असून आपण सर्वानी मिळून एकत्र काम केल्यास 'स्वच्छ पुणे, स्वस्थ पुणे' होऊ शकते अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमास उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्ष नेते निलेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेतेबसोपानकाका चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पक्षनेते अॅड. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), ओमप्रकाश दिवटे, माजी आमदार कुमार गोसावी आदी पदाधिकारी व स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

या उपक्रमाच्या अनुषंगाने दिनांक १६ ते २१ एप्रिल या कालावधीमध्ये संगमवाडी, ओंकारेश्वर तसेच शहरातील सर्व नदी पात्रांमध्ये व घाटांमध्ये डीप क्लीन ड्राइव्ह आयोजित करण्यात आले. या डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत नदीच्या पात्राच्या परिसरातून ४.२ टन प्लॅस्टिक, १२.३ टन राडारोडा व ७.४ टन इतर कचरा गोळा करण्यात आला.

If everyone works together, 'Clean Pune, Healthy Pune' can be achieved: Mayor Nagpure

शेअर करा