मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane News: व्यासपीठावरील समईने घेतला पेट; सरनाईकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

Thane News ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावरील समईने अचानक मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावरील समईने अचानक घेतला पेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावरील समईने अचानक घेतला पेट

Thane News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावरील समईने अचानक घेतला पेट

Thane News ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावरील समईने अचानक मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. समईचा भडका उडताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसंगावधान राखत जवळील फुलांचा वापर करून आग विझवली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.https://maharashtramirror.com/ Thane News

ठाण्यात परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू झाले.https://maharashtramirror.com/ Thane News

दरम्यान, शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावरील समईने अचानक पेट घेतला. काही क्षणांत आगीने मोठा भडका घेतल्याने उपस्थितांमध्ये धांदल उडाली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने पुढे होत जवळच असलेली फुले आगीवर टाकली आणि समई विझवली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

शेअर करा