मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Education News : ई-केवायसी पूर्ण करा…अन्यथा वेतनावर परिणाम

पुणे, महाराष्ट्र मिरर Education News : शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीअंतर्गत कार्यरत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

Education News : ई-केवायसी पूर्ण करा…अन्यथा वेतनावर परिणाम

शिक्षण विभागाचे आवाहन

पुणे, महाराष्ट्र मिरर Education News : शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीअंतर्गत कार्यरत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे या प्रक्रियेसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून, ई-केवायसी पूर्ण न झाल्यास सप्टेंबर महिन्याच्या वेतन प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.Education News

राज्यातील अनुदानित व मान्यताप्राप्त शाळांमधील वेतन शालार्थ प्रणालीद्वारे वितरित केले जाते. कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत ठेवणे, वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि नोंदींची अचूक पडताळणी करणे हा ई-केवायसीचा मुख्य उद्देश आहे.

शिक्षण विभागाने यापूर्वी अनेक वेळा ई-केवायसीसाठी संधी दिली होती. मात्र, अद्याप काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विभागाने आता संबंधितांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
यासोबतच मुख्याध्यापक, प्राचार्य आणि संस्थेच्या प्रशासनालाही आपल्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसीची स्थिती तपासून प्रलंबित प्रकरणे त्वरित पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत.Education News

ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्यास त्या तात्काळ शिक्षण विभाग किंवा शालार्थ प्रणालीच्या तांत्रिक सहाय्यकांकडे नोंदवाव्यात. तसेच प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे व माहितीची खातरजमा करूनच ई-केवायसी पूर्ण करावी, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

शिक्षण विभागाचे आवाहन

“शालार्थ प्रणालीतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. प्रलंबित ई-केवायसीमुळे वेतन प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणताही विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी.”

शेअर करा