मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

अंबोलीतील ‘ड्रग्ज अड्डा’ : पोलिसांच्या साठेबाज संरक्षणाखाली नशेत बुडालेले तरुण!

Andheri Amboli Drug Racket : लाचखोर पोलिस आणि हुक्का पार्लरचे मालक ‘दुहेरी खेळी’; तात्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशांना फाळाघोळ

V
Vivek

1 मिनिट वाचन

अंबोलीतील ‘ड्रग्ज अड्डा’ : पोलिसांच्या साठेबाज संरक्षणाखाली नशेत बुडालेले तरुण!

Andheri Amboli Drug Racket : लाचखोर पोलिस आणि हुक्का पार्लरचे मालक ‘दुहेरी खेळी’; तात्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशांना फाळाघोळ

मुंबई, (अंधेरी) :- मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील अंबोली Andheri Amboli illegal Hukkah Parlour परिसरातील एका बेकायदेशीर हुक्का पार्लरमागे पोलीस संरक्षणाचा भक्कम साठेबाज छत्र उभा आहे! ESCAPE या नागरी संघटनेच्या तक्रारींनंतरही रात्रीच्या अंधारात पोलीस अधिकारी Andheri Police या नशा अड्ड्यावरून अल्पवयीन मुलांपर्यंत MD ड्रग्ज, डुप्लिकेट दारू आणि इतर मादक पदार्थ पुरवण्याचा अमानुष कारभार थांबवत नाहीत. Mumbai Police Latest Crime News

या हुक्का पार्लरमध्ये तरुण विद्यार्थ्यांसह मुलींचे लैंगिक शोषण देखील होत असल्याची भयावह माहिती मिळाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या साठेबाजीमुळे या दुष्ट गटाला ‘अडचणीत’ आणण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही.

हुक्का पार्लरचे मालक मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात, “पोलीसांना दर महिन्याला लाखो रुपये लाच देतो, त्यामुळे कोणतीही कारवाई आमच्यावर होत नाही.” या खुलाश्यानंतर मुंबईतील पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व हुक्का पार्लर आणि क्लबवर बंदी घालण्याचे आदेश दिले,पण मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या साठेबाजीमुळे हे आदेश अपुऱ्या ठरले आहेत. यामुळे तरुण पिढी आणि त्यांच्या कुटुंबांचे भविष्य संकटात आहे.

ESCAPE संघटनेने शासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की, या मादक पदार्थांच्या तस्करीला थोडक्यात रोखण्यासाठी तत्काळ कडक कारवाई करावी आणि लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून Mumbai ला नशामुक्त करावे.

शेअर करा