मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

चिंचवडमध्ये दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने गाडी घसरली

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

चिंचवडमध्ये दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने गाडी घसरली

पिंपरी: चिंचवड येथील मदर टेरेसा ब्रिजवर भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्‍या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ५ मे) रोजी पहाटे तीन वाजताच्‍या सुमारास घडली.


 
आदित्य बसलिंगप्पा मेटी (सध्‍या रा. हडपसर. मूळ रा. कोंबडपाडा, पेण, रायगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कृष्णदेव सुरेश बनसोडे (वय ३४), यांनी चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आदित्य मेटी हा आपली ॲक्टिव्हा दुचाकी (MH-06-BK-7582) घेऊन मदर टेरेसा ब्रिजवरून भरधाव वेगाने जात होता. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने त्याची गाडी घसरली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दुधे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

शेअर करा