मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

धारावी गोळीबार: सराईत गुन्हेगार अटकेत, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Mumbai Dharavi Firing News : धारावी गोळीबार प्रकरणी 'अज्जू'ला अटक, महिलेला लागलेली गोळी चुकून सुटल्याचे पोलिसांसमोर कबूल.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Police News : विनापरवाना बंदुक, कोणतेही शस्त्र वापरण्यास पोलिसांकडून कारवाई

Mumbai Dharavi Firing News : धारावी गोळीबार प्रकरणी 'अज्जू'ला अटक, महिलेला लागलेली गोळी चुकून सुटल्याचे पोलिसांसमोर कबूल.

मुंबई :- मुंबईतील धारावी परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात शाहू नगर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगार मोहम्मद शेख ऊर्फ अज्जू (37 वय) याला अटक केली आहे. Mumbai Latest Firing News या गोळीबारात 32 वर्षीय सरवर बेगम शेख ही महिला जखमी झाली होती. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News

रविवारी रात्री धारावीतील 90 फूट रोडवर खरेदी करत असताना सरवर बेगम शेख यांच्या हाताला गोळी लागली होती. पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि आरोपीच्या हालचालींचा माग काढत त्याला अटक केली. आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, महिलेला मारण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता, तर बेकायदेशीर बंदूक हाताळताना चुकीने गोळी सुटली.

या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 109 (खुनाचा प्रयत्न) आणि भारतीय हत्यार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता आरोपी मोहम्मद शेख ऊर्फ अज्जूला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा