मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dhanajay Munde : "माझ्या वडिलांची उणीव भासू दिली नाही…" धनंजय मुंडेंचा टाहो; अजित पवारांच्या निधनाने 'पवार निष्ठावान' पोरके!

Dhanajay Munde On Ajit Pawar: अजितदादा केवळ नेतेच नव्हे तर 'आधारवड' होते; मुंडे, लंके आणि मुश्रीफ यांना अश्रू अनावर

V
Vivek

1 मिनिट वाचन

dhananjay munde

Dhanajay Munde On Ajit Pawar: अजितदादा केवळ नेतेच नव्हे तर 'आधारवड' होते; मुंडे, लंके आणि मुश्रीफ यांना अश्रू अनावर

बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणातील 'कारखानीस' आणि कामाचा झपाटा असलेले नेतृत्व अजित पवार यांच्या अपघाती निधनाने केवळ राजकीय पोकळीच निर्माण झाली नाही, तर त्यांच्यासोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या सहकाऱ्यांचे वैयक्तिक छत्रही हरपले आहे. अजितदादांच्या जाण्याने त्यांचे खंदे समर्थक आणि मंत्री धनंजय मुंडे यांना प्रचंड धक्का बसला असून, त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना दाटून आलेला कंठ आणि डोळ्यांतील अश्रू रोखता आले नाहीत.

"मी पोरका झालो…" : धनंजय मुंडे

अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले,"वडील गेल्यानंतर माझ्यासारख्याला कधीही वडील नसल्याची जाणीव दादांनी होऊ दिली नाही. संकटाच्या काळात ते नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज दादांच्या जाण्याने मी पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने पोरका झालो आहे."

निलेश लंके आणि हसन मुश्रीफ यांचा आक्रोश

केवळ धनंजय मुंडेच नव्हे, तर खासदार निलेश लंके आणि मंत्री हसन मुश्रीफ हे देखील आपल्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने पूर्णपणे खचले आहेत. "दादांनी आम्हाला राजकारणात बोट धरून चालायला शिकवले, कार्यकर्त्यांना कसे जपावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते," अशा भावना व्यक्त करत या नेत्यांनी जित पवारांच्या 'पितृतुल्य' प्रतिमेचे स्मरण केले.

शेअर करा