मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : ‘आंदोलनाला मुदतवाढ देण्याबाबत सकारात्मक विचार करू’; मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil : ‘ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न’

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis : ‘आंदोलनाला मुदतवाढ देण्याबाबत सकारात्मक विचार करू’; मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil : ‘ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न’

मुंबई :- मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुदतवाढ देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी दिले आहेत. आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला केवळ एका दिवसाची परवानगी आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "जरांगे पाटलांनी आंदोलनासाठी पुन्हा परवानगी मागितली आहे. उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्या कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस या परवानगीचा सकारात्मक विचार करतील."

‘कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न’

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “आम्ही यासाठी एक उपसमिती तयार केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर समिती विचार करत आहे. फक्त आश्वासन देऊन चालणार नाही, तर संविधानात बसणारे कायदेशीर मार्ग कसे काढता येतील, असा सरकारचा प्रयत्न आहे.”
या आंदोलनामुळे दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊ नये, अशी सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. "ओबीसी समाजालाही सांभाळावे लागेल आणि मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल. गेल्या दहा वर्षांत आम्ही मराठा समाजाला न्याय दिला आहे आणि त्यांच्या पाठीशी आहोत."

‘राजकीय पोळी भाजणाऱ्यांना इशारा’

काही लोक मराठा आणि ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी त्यांना इशारा दिला.

"काही लोक दोन समाज एकमेकांसमोर कसे येतील, याचे प्रयत्न माझ्या लक्षात येत आहेत. त्यांना माझं सांगणं आहे की, आंदोलनावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुमचं तोंड भाजेल,” असे ते म्हणाले.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली असून, ती पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आता सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा