मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : संजय राऊत यांचा मोठा दावा: देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपद देण्याची तयारी

Mumbai News : मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

संजय राऊत यांचा मोठा दावा: देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपद देण्याची तयारी
संजय राऊत यांचा मोठा दावा: देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपद देण्याची तयारी

Mumbai News : मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारसदार म्हणून फडणवीस यांना पुढे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, संघाच्या आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी मंत्रिमंडळात सध्या नसलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याला आधी उपपंतप्रधान केले जाईल आणि नंतर मोदींचे वारसदार म्हणून पुढे आणले जाईल. ही माहिती लवकरच स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ‘पीएम इन वेटिंग’ असणारे लोक कधीही पंतप्रधान होत नाहीत आणि सध्या देशात पंतप्रधानपदासाठी कोणतीही जागा रिकामी नाही, असे विधान केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेवरून राजकीय चर्चांना उधाण आणले आहे.

शेअर करा