मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

‘देऊळ बंद 2' 21 मे रोजी चित्रपटगृहात

मुंबई : 'अध्यात्म' आणि 'विज्ञान' यांच्यातील संघर्षाची एक नवी व्याख्या २०१५ साली देऊळ बंदमराठी चित्रपटाने मांडली.

DJ
Dattatraya Jadhav

1 मिनिट वाचन

'Deool Band 2' in theaters on May 21.
'Deool Band 2' in theaters on May 21.

प्रविण तरडे पुन्हा मांडणार अध्यात्म आणि विज्ञानाचा लढा

मुंबई :  'अध्यात्म' आणि 'विज्ञान' यांच्यातील संघर्षाची एक नवी व्याख्या २०१५ साली  देऊळ बंदमराठी चित्रपटाने मांडली.  आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘देऊळ बंद 2’ 21 मे रोजी  जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मे महिन्याच्या सुट्टीत स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरणार आहे.

वटवृक्ष एंटरटेनमेंटच्या वतीने नुकतेच या चित्रपटाचे डिजिटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर पाहताच स्वामी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लेखक आणि दिग्दर्शक प्रविण  तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा करून प्रेक्षकांना मोठी भेट दिली आहे.

देऊळ बंदमध्ये आपण एका नास्तिक वैज्ञानिकाचा देवावर विश्वास बसण्यापर्यंतचा प्रवास किती रंजक होता ते पाहिले. आता 'देऊळ बंद २' मध्येही हाच धागा पकडून पुन्हा एकदा विज्ञानाची सांगड अध्यात्माशी कशी घातली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रविण तरडे यांच्या लेखणीतून उतरलेला हा विषय पुन्हा एकदा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार आहे.

पहिल्या भागातील संवाद आणि स्वामी समर्थांच्या भूमिकेतील कलाकाराचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता दुसऱ्या भागात कोणकोणते नवीन कलाकार दिसणार आणि कथेचे स्वरूप काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केले असून, निर्मिती कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे.

'Deool Band 2' movie in theaters on May 21.

शेअर करा