मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

उरुळी देवाची-फुरसुंगी हद्दीतील कचरा प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी

नगरपरिषदेचा पुणे मनपाला इशारा; विकासकामांसाठी मागितलेला निधी मिळत नसल्याने उचलले पाऊल

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

उरुळी देवाची-फुरसुंगी हद्दीतील कचरा प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी

नगरपरिषदेचा पुणे मनपाला इशारा; विकासकामांसाठी मागितलेला निधी मिळत नसल्याने उचलले पाऊल

निलेश राऊत
पुणे: महापालिकेकडून विकासकामांसाठी मागितलेल्या निधीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने, आता उरुळी देवाची-फुरसुंगी नगपरिषदेने कचरा प्रकल्पाच्या बंदचे हत्यार उपसले आहे. आमच्या हद्दीतील चालू असलेले कचरा प्रकल्प तातडीने बंद करा आणि नवीन कोणतेही प्रकल्प सुरू करू नका, असा इशारा नगरपरिषदेकडून महापालिकेला देण्यात आला आहे.

महापालिका आयुक्तांना निवेदन
उरुळी देवाची-फुरसुंगी नगरपरिषदेचे अध्यक्ष संतोष सरोदे व उपनगराध्यक्ष ओंकार कामठे यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या उरुळी देवाची येथील कचरा डेपोमुळे या भागातील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने पूर्वीप्रमाणे या दोन्ही गावांना म्हणजेच आताच्या नगरपरिषदेला रोज १८० टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा व येथील विकास कामांसाठी दरवर्षी ४० कोटींची तरतूद करावी, अशी मागणी या नगरपरिषदेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यावर महापालिकेने काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता महापालिकेचे नाक दाबण्यासाठी येथील पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कचरा प्रकल्प बंदचा मार्ग अवलंबला आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात महापालिकेचा सुरू असलेल्या कचरा प्रकल्प बंद करावा, अशी मागणी करतानाच तसे आश्वासन यापूर्वी दिले असल्याची आठवण करून दिली आहे. तसेच यापुढील काळात कोणतेही नवीन प्रकल्प आमच्या हद्दीत सुरू करू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उरुळी देवाची-फुरसुंगीच्या दबावतंत्रावर महापालिका काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेअर करा