मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Mumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासाPaternity Leave पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार १५ दिवसांची पितृत्व रजाPune Airport News : पुणे विमानतळ येथे वाहतूक कोंडीवर उपायSupriya Sule ः एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना सुप्रिया सुळेंचा पूर्णविराम; मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याचेही खंडन

Delhi News : २६/११ च्या शहीदांना राजनाथ सिंह यांची श्रद्धांजली; दहशतवाद संपविण्याचा भारताचा निर्धार कायम

Delhi News : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आणि शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

२६/११ च्या शहीदांना राजनाथ सिंह यांची श्रद्धांजली
दहशतवाद संपविण्याचा भारताचा निर्धार कायम

Delhi News : नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आणि शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवाद्यांचा मुकाबला करताना असामान्य धैर्य दाखविणाऱ्या मुंबई पोलिस आणि सुरक्षा दलांच्या जवानांच्या शौर्यालाही त्यांनी अभिवादन केले.

राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर संदेश प्रसिद्ध करत २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यात देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांचे स्मरण केले. दहशतवाद्यांसमोर न झुकता संकटाचा सामना करणाऱ्या पोलीस आणि सुरक्षा दलांच्या जवानांचे धैर्य, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा देशासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुरक्षा दलांनी दाखविलेल्या धैर्यामुळे देशाच्या दहशतवादविरोधी लढ्याला अधिक बळ मिळाले आहे. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले. दरम्यान, २६/११ च्या हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होत असताना देशभरातून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दहशतवादाच्या प्रत्येक स्वरूपाचा मुकाबला करून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारताची बांधिलकी कायम असल्याचा निर्धार राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper