मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : शेतकऱ्यांना तातडीने मदत कराकृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

Mumbai News : मुंबई – राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून विशेषतः सोयाबीन आणि कापूस या पिकांचा मोठा फटका बसला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

शेतकऱ्यांना तातडीने मदत करा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन
शेतकऱ्यांना तातडीने मदत करा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

Mumbai News : मुंबई –राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून विशेषतः सोयाबीन आणि कापूस या पिकांचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असणे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र, अशा कठीण प्रसंगी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे, हीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.https://maharashtramirror.com Mumbai news

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सध्या गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या बिकट प्रसंगी सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एनडीआरएफचे निकष, राज्य शासनाची थेट मदत आणि पीक विमा अशा सर्वच माध्यमांतून शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ maharashtra mirror

फसवणूक करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई होणार

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या आणि कर्ज कमी असताना ते जास्त दाखवून सरकारची फसवणूक करणाऱ्या बँकांची गय केली जाणार नाही. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून अशा बँकांवर कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात कोणत्याही बँकेने असा गैरप्रकार करण्याची हिंमत करू नये, अशा कडक उपाययोजना आम्ही राबवणार आहोत.आढावा बैठकीत झोपणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी

दुष्काळ आढावा बैठकीदरम्यान काही अधिकारी निष्काळजीपणा दाखवत असल्याच्या आणि डुलक्या घेत असल्याच्या आरोपांवर बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, या बैठकीला सुमारे तीनशे ते साडेतीनशे अधिकारी उपस्थित होते. ज्या वेळी ज्या तालुक्याची माहिती विचारली जात होती, त्या वेळचे अधिकारी आपापल्या भागाचा आढावा मांडत होते. जर एखादा अधिकारी बैठकीत झोपलेला आढळला असेल तर त्याची नक्कीच चौकशी केली जाईल. काही अधिकारी मोबाईलवर माहिती घेत असण्याचीही शक्यता असते, मात्र एवढ्या मोठ्या उपस्थितीत कोण काय करत आहे हे तात्काळ लक्षात येत नाही. तरीही निष्काळजीपणा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा