मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dahi Handi 2025 : दहीहंडीचा थरार! कोकण नगरच्या गोविंदांनी रचला 'दशका'चा थर, नवा विश्वविक्रम नावावर!

Kokan Nagar Govinda Pathak 2025 : जय जवानचा विक्रम मोडला, 10 थर रचून इतिहास घडवला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dahi Handi 2025

Kokan Nagar Govinda Pathak 2025 : जय जवानचा विक्रम मोडला, 10 थर रचून इतिहास घडवला

ठाणे :- मुंबईतील कोकण नगर गोविंदा पथकाने यंदाच्या दहीहंडी उत्सवात अभूतपूर्व पराक्रम करत दहीहंडीचे 10 थर यशस्वीपणे रचले आहेत. ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत हा थरार पाहायला मिळाला. या विक्रमामुळे कोकण नगरच्या गोविंदांनी 'जय जवान' गोविंदा पथकाचा जुना विक्रम मोडीत काढून नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीच्या थरांचा विक्रम रचण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस असते. यंदा प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडी उत्सवात हजारो प्रेक्षकांसमोर कोकण नगरच्या तरुणांनी एकाग्रता आणि साहसाचे अनोखे प्रदर्शन केले. अत्यंत कुशलतेने आणि समन्वयाने त्यांनी एकानंतर एक थर चढवत गेले. अंतिम थर पूर्ण होताच टाळ्यांचा कडकडाट आणि 'गोविंदा आला रे आला'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यापूर्वी 'जय जवान' पथकाने 9 थर रचण्याचा विक्रम केला होता. मात्र, कोकण नगरच्या या विक्रमी कामगिरीमुळे दहीहंडीच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विक्रमाने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर भारताचे नाव जागतिक स्तरावर पुन्हा एकदा झळकवले आहे.

हेही वाचा: Pune Accident News : ट्रॅफिक डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला मद्यधुंद चालकाने दिली धडक

शेअर करा