मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Cyber Police : सायबर पोलिसांचा 'जादूचा हात'! - फसवणूक झालेली संपूर्ण 2.30 लाखांची रक्कम तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर तक्रारदाराला परत

Mira Bhayandar Cyber Crime News : व्हाट्सएपद्वारे 'APK File' पाठवून केलेली फसवणूक उघड; अनोळखी खाती गोठवली; न्यायालयीन प्रक्रियेनंतर मीरा-भाईंदर पोलिसांचे मोठे यश

V
Vivek

1 मिनिट वाचन

Cyber Police : सायबर पोलिसांचा 'जादूचा हात'! - फसवणूक झालेली संपूर्ण 2.30 लाखांची रक्कम तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर तक्रारदाराला परत

Mira Bhayandar Cyber Crime News : व्हाट्सएपद्वारे 'APK File' पाठवून केलेली फसवणूक उघड; अनोळखी खाती गोठवली; न्यायालयीन प्रक्रियेनंतर मीरा-भाईंदर पोलिसांचे मोठे यश

मीरा-भाईंदर :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने एका ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्याचा यशस्वीरित्या छडा लावून, फसवणूक झालेली संपूर्ण 2 लाख 30 हजार रुपये रक्कम तक्रारदाराच्या मूळ बँक खात्यात परत मिळवून दिली आहे. सायबर गुन्हेगारांच्या खात्यातून रक्कम काढून घेण्याचे हे एक महत्त्वाचे यश मानले जात आहे.

थरारक फसवणुकीची घटना

मीरा रोड येथील रहिवासी मोहमद खान यांना अनोळखी व्यक्तीने मित्राच्या नावाने व्हाट्सएपवर संपर्क साधला. तातडीने पैसे पाठवण्याचे निमित्त सांगून त्याने एक 'APK File' लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितले. खान यांनी त्या लिंकवर क्लिक करताच, त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2.30 लाख रुपये कपात झाले आणि त्यांची फसवणूक झाली.

पोलिसांचा यशस्वी पाठपुरावा

तक्रार मिळताच सायबर पोलीस ठाण्याने तात्काळ NCCRP पोर्टलवर तक्रार नोंदवली. फसवणुकीची रक्कम ज्या सहा बँक खात्यांमध्ये वर्ग झाली होती, ती खाती शोधून पोलिसांनी तात्काळ ती गोठवण्याची (Freeze) कारवाई केली.

तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर आणि बँकांशी सातत्याने पत्रव्यवहार करून, तसेच न्यायालयात अहवाल सादर करून न्यायालयाचे आदेश मिळवले. सायबर पोलिसांनी यशस्वी पाठपुरावा करत तक्रारदाराची संपूर्ण 2.30 लाख ही रक्कम त्यांच्या खात्यात परत जमा केली आणि त्यांना प्रतिकात्मक चेक देऊन माहिती दिली.

शेअर करा