मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : ठाण्यात भररस्त्यात तरुणाची हत्या

पोलिसांकडून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न, व्हिडिओ वायरल

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : ठाण्यात भररस्त्यात तरुणाची हत्या

पोलिसांकडून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न, व्हिडिओ वायरल

ठाणे CRIME NEWS: वाद मिटविण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात वर्तकनगर परिसरात घडली होती. या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ समोर आला असून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.CRIME NEWS

विष्णु नायर असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी प्रकाश तिखे, विकी तिखे, विकी करोतीया, सिद्धार्थ रोकडे, गणेश दिवे यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी मध्यरात्री सुमारे २.४० वाजता वर्तकनगर येथील शास्त्रीनगर नाका परिसरात विष्णु नायर हा आपल्या मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी विष्णुच्या मित्राचा प्रकाश तिखे याच्यासोबत वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी विष्णु पुढे गेला असता, प्रकाश तिखे याने त्याला शिवीगाळ करत परिसरात आपली दादागिरी चालत असल्याचे सांगितले.CRIME NEWS

यानंतर प्रकाश तिखे याने त्याच्याकडील चाकू काढला. प्रकाश तिखे आणि त्याचा भाऊ विकी तिखे या दोघांनी विष्णुच्या दिशेने धाव घेतली. विष्णु खाली पडल्यानंतर प्रकाश तिखे याने त्याच्या छातीवर बसून चाकूने पोटाच्या डाव्या बाजूला आणि छातीखाली वार केले. तर विकी तिखे याने विष्णुला मारहाण केली.CRIME NEWS

या हल्ल्यात विष्णु नायर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर विकी करोतीया, सिद्धार्थ रोकडे, गणेश दिवे आणि इतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत उपस्थितांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि तेथून पसार झाले.

या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

CRIME NEWS

शेअर करा