मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : तळवडे रोड येथे हॉटेलच्या गाळ्यात विनापरवाना दारू विक्री

दोन नोकरांसह मालकांवर गुन्हे; ६६ लाख १२५ रुपयांचा मुद्देमाल विक्रीसाठी ठेवला

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : तळवडे रोड येथे हॉटेलच्या गाळ्यात विनापरवाना दारू विक्री

दोन नोकरांसह मालकांवर गुन्हे; ६६ लाख १२५ रुपयांचा मुद्देमाल विक्रीसाठी ठेवला

पिंपरी CRIME NEWS: एका हॉटेलच्या गाळ्यामध्ये बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोन नोकरांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार (५ जून) रात्री ९ वाजता साईप्रसाद हॉटेल, गणेशनगर, तळवडे रोड येथे करण्यात आली. सुदीपकुमार पालनकुमार (२०) आणि दिलीप मुंशीलाल गौतम (१९, दोघे रा. तळवडे रोड) यांच्यासह हॉटेल मालक सचिन कुमार नाईक आणि जागा मालक पानसरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद व्होनमाने यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालकाच्या सांगण्यावरून आरोपी नोकरांनी गाळ्यामध्ये विनापरवाना ११ हजार ५४५ रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, दारू साठवण्यासाठी वापरलेला फ्रीज, ४० हजार रुपयांच्या बिअरचा साठा आणि ४ हजार ५८० रुपये रोख रक्कम असा एकूण ६६ लाख १२५ रुपयांचा माल विक्रीसाठी बाळगला होता. तसेच जागा मालकाने गाळ्यात बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचे माहीत असूनही गाळा भाड्याने दिला असल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.CRIME NEWS

CRIME NEWS

शेअर करा