मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : दिवे घाटात दोन सराईत गुंड दोन पिस्तुले व ११ काडतुसांसह जेरबंद

गुन्हे शाखा युनिट ६ ची धडक कारवाई; फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

CRIME NEWS : दिवे घाटात दोन सराईत गुंड दोन पिस्तुले व ११ काडतुसांसह जेरबंद

गुन्हे शाखा युनिट ६ ची धडक कारवाई; फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने दिवे घाट परिसरात सापळा रचून दोन सराईत गुंडांना दोन बेकायदेशीर गावठी पिस्तुले आणि अकरा जिवंत काडतुसांसह रंगेहाथ अटक केली आहे. ऐन घाटाच्या संवेदनशील परिसरात घातक शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या या गुंडांना जेरबंद केल्यामुळे पोलिसांनी एका मोठ्या संभाव्य गुन्ह्याचा कट उधळून लावला आहे.CRIME NEWS

मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या अंमलदारांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे ही धाडसी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख १ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे यश महेश मोडक (वय २३ वर्षे, रा. मांजरी खुर्द, पुणे) आणि गौरव आण्णा नेटके (वय २२ वर्षे, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) अशी असून, हे दोन्ही आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३०(९)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.CRIME NEWS

बुधवारी (ता. १०) गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांचे पथक मांजरी पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयितांचा माग काढत असताना ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

तपासादरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार समीर पांडुळे आणि गणेश माने यांना त्यांच्या विश्वासू गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की, मांजरी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील दोन गुन्हेगार दिवे घाटात फिरत असून त्यांच्याकडे बेकायदेशीर घातक शस्त्रे आहेत. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी तात्काळ पथकाला दिवे घाटाच्या दिशेने रवाना केले. पोलिसांनी दिवे घाटातील विठ्ठल मूर्तीच्या अलीकडे सुमारे वीस मीटर अंतरावर घाटाच्या बाजूला सापळा रचला. तेथे संशयास्पदरीत्या उभे असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अत्यंत शिताफीने वेढा घालून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या कंबरेला लावलेली दोन बेकायदेशीर गावठी पिस्तूल आणि तब्बल अकरा जिवंत काडतुसे तसेच दोन मोबाईल जप्त करण्यात आले.CRIME NEWS

सदरची उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी पुणे शहर पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि साहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, प्रमोद टिळेकर, समीर पांडुळे, झाकीर पठाण, सतीश वणवे, शेखर काटे, गणेश माने, उमेश शेलार, अनिल जामगे, तसेच महिला पोलीस अंमलदार पल्लवी修 मोरे, अश्विनी गायकवाड आणि लोखंडे यांच्या विशेष पथकाने केली आहे.

CRIME NEWS

शेअर करा