मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : घरफोडी करणारे दोघे अटकेत; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

चंदननगर येथील घटना

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : घरफोडी करणारे दोघे अटकेत; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

चंदननगर येथील घटना

पुणे CRIME NEWS: चंदननगर परिसरात झालेल्या घरफोडी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत चंदननगर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सोने, चांदीचे दागिने आणि ऑटोरिक्षासह 3 लाख 1 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.CRIME NEWS


रोहित नितीन गायकवाड (वय 28, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे), मनीष सुजीत नागपुरे (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.CRIME NEWS


चंदननगर परिसरात २८ मे रोजी झालेल्या घरफोडीप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाच्या तपासादरम्यान घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये ऑटोरिक्षा (एमएच-१२ एनडब्ल्यू-८२४७) आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत असताना रिक्ष्ा चालक रोहित गायकवाड याचा शोध घेतला. मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपला साथीदार मनीष नागपुरे याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर ४ जून रोजी त्याला अटक करण्यात आली. तपासात आरोपींनी चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने महंमदवाडी व वानवडी परिसरातील सोनारांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी १५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १३०.२७ ग्रॅम चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली ऑटोरिक्षा असा एकूण ३ लाख १ हजार ५०० रुपये असा मुद्देमाल जप्त केला.CRIME NEWS


ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे करीत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा