मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : दापोडीत १० लाखांच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक

संशयित बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करत होते

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : दापोडीत १० लाखांच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक

संशयित बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करत होते

पिंपरी, CRIME NEWS: जुन्या पुणे-मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तब्बल १० लाख ८५ हजार रुपये किमतीचे एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (२८ जून) पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास दापोडी येथील सुदामाचे पोहे हॉटेल समोर करण्यात आली.CRIME NEWS

या प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल रणधिर माने यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी आर्यन रविंद्र यादव (२०, रा. पुणे) आणि शोएब शकिल शेख उर्फ वस्ताद (२५, रा. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे जुन्या पुणे-मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर सीएनजी पंपाशेजारी बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून १० लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचे ९८.५६ ग्रॅम वजनाचे एम. डी. ड्रग्ज, एक दुचाकी आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. हे ड्रग्ज गणेश पेठ येथील शोएब शेख याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले असून दापोडी पोलीस तपास करत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा