मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : हडपसरमधील प्राणघातक हल्ल्यातील तीन आरोपी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी; ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून लावला शोध

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

CRIME NEWS : हडपसरमधील प्राणघातक हल्ल्यातील तीन आरोपी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी; ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून लावला शोध

पुणे, महाराष्ट्र मिरर CRIME NEWS : पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील तीन फरारी आरोपींना पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे.CRIME NEWS

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील तब्बल ५० बंदिस्त कॅमेऱ्यांचे (सीसीटीव्ही) चित्रीकरण आणि अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. या अत्यंत क्लिष्ट तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे हडपसर आणि मांजरी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचा मोठा वाचक बसला आहे.CRIME NEWS

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे वैष्णव अनिल शेवाळे (वय २४ वर्षे, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, पुणे), रिहान महमद सय्यद (वय १९ वर्षे, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, पुणे) आणि यश प्रवीण सोनवणे (वय २४ वर्षे, रा. ढेरे बंगला, मांजरी बुद्रुक, पुणे) अशी आहेत.

या तिघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बुधवारी (ता. १०) गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने या अज्ञात आरोपींचा माग काढून त्यांना जेरबंद केले.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करून मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान होते. गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटना घडलेल्या परिसरातील आणि आरोपी पळून गेलेल्या मार्गावरील तब्बल ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण अत्यंत बारकाईने तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचे ठावठिकाणे आणि त्यांच्या हालचाली स्पष्ट झाल्या. या तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मांजरी बुद्रुक परिसरातील गोपाळपट्टी आणि ढेरे बंगला भागात एकाच वेळी छापे टाकून वैष्णव शेवाळे, रिहान सय्यद आणि यश सोनवणे या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर तपासासाठी आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांना हडपसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.CRIME NEWS

सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि साहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, श्रीकांत पांडुळे, अमित कांबळे, प्रमोद टिळेकर, गणेश माने, उमेश शेलार, शेखर काटे आणि अनिल जामगे यांच्या पथकाने अत्यंत कार्यक्षमपणे पार पडली आहे.

CRIME NEWS

शेअर करा