मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून भोसरीत ५५ लाखांची लूट

चोरट्यांनी व्हिडिओ कॉल करून दिल्लीचे पोलीस अधिकारी असल्याचे भासवले

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून भोसरीत ५५ लाखांची लूट

चोरट्यांनी व्हिडिओ कॉल करून दिल्लीचे पोलीस अधिकारी असल्याचे भासवले

पिंपरी CRIME NEWS : भोसरी येथील एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी व्हिडिओ कॉल करून आपण दिल्लीचे पोलीस अधिकारी असल्याचे भासवले आणि मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात डिजिटली अटक करण्याची भीती दाखवून ५५ लाख रुपये उकळले. ही घटना १० मे ते ३ जून दरम्यान एकता कॉलनी भोसरी येथे ऑनलाईन माध्यमातून घडली.CRIME NEWS :

या प्रकरणात भोसरी येथील एका ३९ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेलिकॉम ऑफिसर दिल्ली, सीबीआय ऑफिसर बाराखंबा पोलीस ठाणे दिल्ली, आयसीआईसीआई बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या संबंधित खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा आधार कार्ड नंबर ड्रग्ज व मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात वापरला गेल्याचे सांगितले. फोनवरील व्यक्ती पोलीस गणवेशात असल्याने फिर्यादीला खरी पोलीस कारवाई वाटली. आरोपींनी फिर्यादीला घरातून बाहेर न जाण्याची आणि कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.CRIME NEWS :

त्यानंतर बँक खात्यावरील रक्कम व्हेरिफाय करून परत करतो असे सांगत आयसीआईसीआई आणि सेंट्रल बँकेच्या खात्यांवर एकूण ५५ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलीस तपास करत आहेत.CRIME NEWS :

CRIME NEWS :

शेअर करा