मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Crime News आर्थिक फसवणूकीसह मानसिक छळाला कंटाळून पुण्यात बांधकाम व्यवसायिकाची आत्महत्या

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : आर्थिक फसवणूक, कोट्यवधी रुपयांची थकबाकी आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून खलील रज्जूलाल शेख (वय ६५) या ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील गुलटेकडी परिसरात घडली.

VZ
vidula zagade

3 मिनिट वाचन

Crime News आर्थिक फसवणूकीसह मानसिक छळाला कंटाळून पुण्यात बांधकाम व्यवसायिकाची आत्महत्या

माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह चौदा जणांवर गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : आर्थिक फसवणूक, कोट्यवधी रुपयांची थकबाकी आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून खलील रज्जूलाल शेख (वय ६५) या ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील गुलटेकडी परिसरात घडली. आत्महत्या करण्यापूर्वी शेख यांनी लिहलेल्या सुसाईट नोट आणि धक्कादायक खुलासे करणारे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी माजी आमदार आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांच्यासह चौदा जणांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पुण्याच्या राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी आमदार रवींद्र धंगेकर, प्रतिभा रवींद्र धंगेकर, बाळासाहेब शेडगे, वर्षा बाळासाहेब शेडगे, विशाल केदारी, सुनील अय्यर, सुनील अय्यर यांचा मुलगा(नाव समजू शकले नाही), रघू गौडा, सुनील बोरा, राजन सेठिया, हमीद भाई शेख, हमीद भाई शेख यांचा मुलगा (नाव समजू शकले नाही), शाम कोळपकर (कोळेकर), शुभम (पूर्ण नाव समजू शकले नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुलताना खलील शेख (वय ५०, रा.आशियाना रोशन बी बिल्डिंग, डायस प्लॉट परिसर, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे.Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत खलील रज्जूलाल शेख हे सेंट्रींग आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. हा मानसिक छळाचा आणि आर्थिक फसवणुकीचा प्रकार सन २०१५ पासून ते १५ जुलै २०२६ पर्यंत सुमारे अकरा वर्षे सुरू होता.खलील शेख यांनी विविध बांधकाम प्रकल्पांसाठी केलेल्या कामांचे कोट्यवधी रुपये बाजारात अडकले होते. अनेक जण त्यांचे कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होते, तर व्यावसायिक कामापोटी शेख यांनी बाजारातून व्याजाने घेतलेल्या पैशांचा त्यांच्यावर मोठा दबाव होता. त्यामुळे सतत ते तणावाखाली होते. यातूनच त्यांना नैराश्य आल्याने आणि मानसिक ताण असह्य झाल्याने त्यांनी राहत्या घरात सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले.

स्वारगेट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र जगदाळे यांनी प्राथमिक गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह सिसोदे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.Crime News

सुसाईड नोट आणि व्हिडिओमधील धक्कदायक खुलासे

आत्महत्या करण्यापूर्वी खलील शेख यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये आणि सुसाईड नोटमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. पन्नास लाखांची थकबाकी- खलील शेख यांनी लक्ष्मी रस्त्यावरील एका पुनर्विकास प्रकल्पासाठी ‘उत्कर्ष असोसिएट्स’ या कंपनीसोबत भागीदारी केली होती. या कंपनीच्या भागीदारांकडे त्यांचे सुमारे ५० लाख रुपये येणे बाकी होते. पैशांची मागणी केली असता संबंधित भागीदारांकडून टाळाटाळ केली जात होती आणि एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात होती.जीवे मारण्याच्या धमक्या- मनसेचे माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांनी शेख यांना “पुण्यात कुठेही काम करू देणार नाही, तुझे जगणे कठीण करू” अशा धमक्या दिल्याचा आरोप व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. तसेच शेडगे याने शेख यांचे सेंट्रींगचे लाखो रुपयांचे साहित्यही आपल्या ताब्यात घेतले होते. मुलाच्या व्यवसायात अडथळे- आरोपींकडून केवळ खलील शेख यांनाच नव्हे, तर त्यांच्या मुलालाही व्यवसायात मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण केले जात होते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब दबावाखाली होते.

या संशयित आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक, गुन्हेगारी धमकी आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘उत्कर्ष असोसिएट्स’ आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचा वाद

या प्रकरणाची पाळेमुळे रविवार पेठेतील वक्फ बोर्डाच्या एका जमिनीच्या वादाशी जोडलेली आहेत. या जमिनीवर ‘उत्कर्ष असोसिएट्स’ या कंपनीकडून एका इमारतीचे बांधकाम केले जात होते. या कंपनीत खलील शेख यांच्यासह प्रतिभा धंगेकर, वर्षा शेडगे आणि अन्य दोन जण असे एकूण पाच भागीदार होते. मात्र, वक्फ बोर्डाकडून आणि न्यायालयीन स्तरावर या प्रकल्पाला स्थगिती मिळाल्यामुळे हा प्रकल्प रेंगाळला. प्रकल्प रखडल्याने बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकले आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रचंड आर्थिक विवंचनेतून खलील शेख यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.Crime News

न्यायालयात बाजू मांडणार - माजी आमदार रवींद्र धंगेकर

आपल्यावरील आणि पत्नीवरील सर्व आरोप फेटाळून लावताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “माझ्या पत्नीने २०२५ मध्येच या कंपनीच्या भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आमचा आणि खलील शेख यांचा थेट कोणताही संवाद किंवा वाद झालेला नाही. जे काही आर्थिक व्यवहार झाले ते कंपनीच्या स्तरावर झाले असून आम्ही कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहत नव्हतो. राजकीय सूडबुद्धीने या प्रकल्पाचा बळी देण्यात आला असून आम्ही या प्रकरणी न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मांडू.

पोलीस तपास आणि पुढील कारवाई

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वारगेट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे. डिजिटल पुराव्यांचे संकलन करण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर ‘ई-साक्ष’ प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे. या गुन्ह्यातील कलमांनुसार दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्याने पोलीस लवकरच आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे.

Crime News

शेअर करा