CRIME NEWS : विमाननगरमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा मोबाईल व सोन्याची अंगठी चोरी
एकूण ७९ हजार १८५ रुपयांचा ऐवज पळवला
1 मिनिट वाचन

एकूण ७९ हजार १८५ रुपयांचा ऐवज पळवला
पुणे CRIME NEWS: विमाननगर परिसरात झोपलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल फोन आणि सोन्याची अंगठी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय फिर्यादी हे मूळचे आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहेत. १० जून २०२६ रोजी पहाटे ३ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ते विमाननगर रोडवरील इम्प्रेस बिल्डिंगसमोरील अॅलिस आईस्क्रीम पार्लरजवळ झोपले होते.CRIME NEWS
याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील मोबाईल फोन आणि सोन्याची अंगठी असा एकूण ७९ हजार १८५ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.CRIME NEWS
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे करीत आहेत.
CRIME NEWS




