मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : चिंचवड येथे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने भावावर चाकूहल्ला

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : चिंचवड येथे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने भावावर चाकूहल्ला

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी CRIME NEWS: आपल्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून मोठ्या भावाने आणि कुटुंबियांनी मिळून एका तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व चाकूने डोक्यात वार करून जखमी केले. ही घटना शनिवारी (२७ जून) दुपारी १२ वाजताच्या सुमारास लिंक रोड पत्रा शेड, चिंचवड येथे घडली.CRIME NEWS

याबाबत आकाश बबन साळवे (३०, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक बबन साळवे (४०), प्रकाश बबन साळवे (३४), शारदा बबन साळवे (६५) आणि बबन साळवे (७०, सर्व रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

फिर्यादी कामावर असताना घरी वाद सुरू असल्याने त्यांनी मध्यस्थी करून भांडण मिटवले होते. मात्र आरोपी त्यांच्या अंगावर धावून आल्याने फिर्यादींनी पोलिसात तक्रार केली. याचाच राग धरून आरोपींनी फिर्यादीला गाठून "आमच्या विरोधात तक्रार देतो काय" असे म्हणत मारहाण सुरू केली. यावेळी मोठ्या भावाने शेजारच्या घरातील चाकूने फिर्यादीच्या डोक्यावर आणि कानाच्या मागे वार केले, तसेच नाकावर मारहाण केली. फिर्यादीची पत्नी भांडण सोडवायला आली असता लहान भावाने तिलाही ढकलून दिले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा