मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Crime News : गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्याला युएईतून अटक

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : जादा परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे ८८ कोटी रूपयांची फसवणूक करणाऱ्या एपीएस वेल्थ व्हेंच्युअरस एलएलपी कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोड याला पुणे शहराच्या आर्थिक गुन्हे शाखेने संयुक्त अरब अमिराती येथून भारतात आणून अटक केली आहे.

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

Crime News : गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्याला युएईतून अटक

चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला दहा दिवसांची कोठडी

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : जादा परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे ८८ कोटी रूपयांची फसवणूक करणाऱ्या एपीएस वेल्थ व्हेंच्युअरस एलएलपी कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोड याला पुणे शहराच्या आर्थिक गुन्हे शाखेने संयुक्त अरब अमिराती येथून भारतात आणून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.Crime News

अविनाश राठोड, विशाखा अविनाश राठोड यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून करार केले, मात्र त्यानंतर कराराचा भंग करून फिर्यादीची ८६. ३७ लाखांची तसेच इतर गुंतवणूकदारांची मिळून सुमारे ८८ कोटींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अविनाश राठोड आणि विशाखा राठोड हे फरार झाले होते. ते परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन २४ एप्रिल २०२४ रोजी त्यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले. तसेच न्यायालयाकडून नॉन-बेलेबल वॉरंट, प्रोक्लेमेशन प्रक्रिया आणि अन्य कायदेशीर कारवाई करण्यात आली. आरोपींचे पासपोर्टही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.Crime News

यानंतर ४ जून २०२६ रोजी आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. या नोटिशीच्या आधारे २३ जुलै २०२६ रोजी UAE प्रशासनाच्या सहकार्याने अविनाश राठोड याला भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. मुंबई विमानतळावर ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.Crime News

इतर आरोपींना भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू

या प्रकरणातील परदेशात फरार असलेल्या इतर आरोपींनाही भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, संबंधित देशांच्या यंत्रणांशी समन्वय साधून पुढील कारवाई केली जात आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.Crime News

Crime News

शेअर करा