मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १.३६ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

पुणे-मुंबई महामार्गावर गोव्यात तयार झालेलय बनावट विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

CRIME NEWS : उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १.३६ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

पुणे-मुंबई महामार्गावर गोव्यात तयार झालेलय बनावट विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त

पुणे CRIME NEWS: राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावर मोठी कारवाई करत गोवा राज्यात तयार झालेले, मात्र मध्य प्रदेशातील बनावट लेबल लावून वाहतूक करण्यात येत असलेले विदेशी मद्य जप्त केले. या कारवाईत सुमारे १.३६ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून बनावट मद्याच्या आंतरजिल्हा साखळीचा पर्दाफाश झाला आहे.

आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.CRIME NEWS

गोव्यात तयार झालेल्या मद्याला मध्य प्रदेशात निर्मित व विक्रीसाठी असलेले लेबल
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार १० जून रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावरील सुतारवाडी, पाषाण परिसरात एका कंटेनरची (क्रमांक एनएल ०१ एन ५२६७) तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये "रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की" या ब्रँडच्या विदेशी मद्याचे तब्बल १,२०० बॉक्स आढळून आले. या मद्यावर गोव्यात तयार झालेल्या मद्याला मध्य प्रदेशात निर्मित व विक्रीसाठी असलेल्या लेबलांचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

१०,३६८ बल्क लिटर मद्य जप्त
वाहनातून १८० मिली क्षमतेच्या बाटल्यांमधील एकूण १०,३६८ बल्क लिटर मद्य जप्त करण्यात आले. वाहन चालकाकडे मद्य वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना किंवा पास नसल्याचे आढळून आले. याशिवाय कंटेनरमध्ये सापडलेली टॅक्स इनव्हॉइस आणि इतर कागदपत्रे बनावट असल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आला आहे.CRIME NEWS

या कारवाईत सुमारे १ कोटी २० लाख ९६ हजार रुपयांचा मद्यसाठा, १५ लाख रुपयांचे कंटेनर वाहन आणि इतर साहित्य असा मिळून १ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रकरणी वाहन चालक पप्पूलाल भिखाराम बिष्णोई (वय ३४, रा. बारमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

जप्त मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून ते बनावट असल्याची शक्यता तपासली जात आहे. या कारवाईत निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, शंकर जाधव यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सहभाग घेतला.CRIME NEWS

दरम्यान, पुणे जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा 020-26917321 वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

CRIME NEWS

शेअर करा