मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : घरफोडी करणारा सराईत अटकेत

पुणे, महाराष्ट्र मिरर CRIME NEWS : घरफोडी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने गजाआड करून त्याच्याकडून चोरीतील रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.CRIME NEWS

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : घरफोडी करणारा सराईत अटकेत

पुणे, महाराष्ट्र मिरर CRIME NEWS: घरफोडी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने गजाआड करून त्याच्याकडून चोरीतील रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.CRIME NEWS

मनीष काकडे (वय २९, रा. सुखसागर नगर, कात्रज, पुणे) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

समर्थ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, यामध्ये आरोपीने गुन्हा करताना राखाडी रंगाची ॲक्टिव्हा मोपेड वापरल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी वाहनाचा माग काढत मनीष काकडे याला ताब्यात घेतले.CRIME NEWS

चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली. आरोपीने भावाची ॲक्टिव्हा घेऊन भवानी पेठेतील क्रिस्टल टॉवर सोसायटी परिसरात जाऊन इमारतीच्या भिंतीवरून उडी मारून घरफोडी केल्याचे सांगितले.
तसेच, पंचांसमक्ष त्याच्या वाहनाची डिक्की तपासण्यात आली. त्यामध्ये ३० हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. चोरीतील मोबाईल त्याने आपल्या ओळखीच्या मित्राला दिल्याचेही चौकशीत उघड झाले. त्याला पुढील तपासासाठी समर्थ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.CRIME NEWS

ही कारवाई पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.

CRIME NEWS

शेअर करा