मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS :फुगेवाडी येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

संशयिताने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवली

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS :फुगेवाडी येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

संशयिताने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवली

पिंपरी CRIME NEWS: पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (५ जून) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडला. रावसाहेब वामनराव कंडाळे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.CRIME NEWS

याप्रकरणी अभिषेक वसंत बोरसे (२२, रा. मोशी ) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक संजय विनायक अकोलकर (५८, रा. नवी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

संजय अकोलकर याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवली. फुगेवाडी येथे सँडविक कंपनीच्या समोर आल्यानंतर त्याने रावसाहेब यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. रावसाहेब या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा