CRIME NEWS : पुणे रेल्वे स्थानकावरील भिकाऱ्यांवर लागणार लगाम
४२ भिकार्यांसह बेघर व्यक्तींची येरवडा कारागृहात रवानगी
1 मिनिट वाचन

४२ भिकार्यांसह बेघर व्यक्तींची येरवडा कारागृहात रवानगी
पुणे CRIME NEWS: पुणे रेल्वे स्थानक आणि फलाटांवर फिरणारे ४२ भिकारी आणि बेघर व्यक्तींवर कारवाई करण्यात येउन त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. स्थानकावर स्वच्छता, सुरक्षा आणि प्रवाशांसाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि शासकीय रेल्वे पोलीस यांनी संयुक्त विशेष मोहीम राबवली.CRIME NEWS

गेल्या पंधरा दिवसांत राबवण्यात आलेल्या या संयुक्त मोहिमेत एकूण ४२ भिकारी व बेघर व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २५ मे रोजी ४, २९ मे रोजी २६ आणि ६ जून २०२६ रोजी १२ जणांचा समावेश आहे. या सर्व व्यक्तींना कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.CRIME NEWS
मोहिम सुरूच राहणार
अनधिकृत कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी ही मोहीम भविष्यातही नियमितपणे सुरू ठेवणार असल्याचे आरपीएफ व जीआरपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
CRIME NEWS




