CRIME NEWS : खून प्रकरणातील फरार आरोपी अटकेत
भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
1 मिनिट वाचन

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली होती, तर पाचवा आरोपीही आता पोलिसांच्या ताब्यात आला आहे.CRIME NEWS

आदित्य काका गायकवाड (वय १९, रा. धायरी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, विशाल दत्तात्रय खोपडे, अभिषेक दिलीप खोपडे, सचिन हरिश्चंद्र धुळे, अनिनाथ शिवाजी कसबे यांना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे.CRIME NEWS
तेजस पिलाणे याचा २५ एप्रिल २०२६ रोजी कात्रजकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाचपैकी चार आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
फरार असलेला आदित्य गायकवाड हा पोलीस अंमलदारांना तो लेकटाऊन रोड परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून २४ जून रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता त्याला ताब्यात घेतले.CRIME NEWS
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे, तुकाराम सुतार, राहुल शेडगे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोरे, मितेश चोरमोळे, अभिनव चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले आणि सोहन शेंडकर यांच्या पथकाने केली.
भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत.
CRIME NEWS




