CRIME NEWS : भोसरीत घराच्या व्यवहारात ठरलेली रक्कम न देता १४ लाख लुबाडले
पैसे मागितल्यास फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी
1 मिनिट वाचन

पैसे मागितल्यास फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी
पिंपरी CRIME NEWS: घराचा ठरलेला व्यवहार रद्द करून, दिलेली रक्कम परत न करता तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन एका व्यक्तीची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १८ जुलै २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ दरम्यान हनुमान नगर, धावडे वस्ती, भोसरी येथे घडली असून २५ जून रोजी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.CRIME NEWS

याबाबत प्रदिप गोपाल गुप्ता (३७, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नरेश रामचंद्रराव बालकोंडेकर (४२, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS
फिर्यादी आणि आरोपी यांच्यात भोसरी येथील एका घराच्या खरेदीचा व्यवहार एकूण ३५ लाख रुपयांना ठरला होता. त्यापैकी २५ लाख रुपये फिर्यादीने गुगल पे, आरटीजीएस आणि चेकद्वारे दिले व खरेदीखतही करून घेतले. उर्वरित १० लाख रुपये देण्यास फिर्यादी तयार असतानाही आरोपीने व्यवहार रद्द केला. फिर्यादीने आपले २५ लाख रुपये परत मागितले असता आरोपीने ११ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित १४ लाख रुपये देण्यास नकार देत 'पैसे मागितले तर तुला बघून घेऊ' अशी धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
CRIME NEWS




