मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदून CJP चे नेते जंतरमंतरवर; अजिंक्य शिंदे, आशुतोष रांका यांना ताब्यात

Delhi News : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांनी मंगळवारी पहाटे आंदोलनस्थळी धडक दिली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदून CJP चे नेते जंतरमंतरवर; अजिंक्य शिंदे, आशुतोष रांका यांना ताब्यात
दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदून CJP चे नेते जंतरमंतरवर; अजिंक्य शिंदे, आशुतोष रांका यांना ताब्यात

Delhi News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; मतदार यादीत पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन, पोलिसांची तातडीने कारवाई

Delhi News : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांनी मंगळवारी पहाटे आंदोलनस्थळी धडक दिली. हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत दाखल झालेल्या आंदोलकांमुळे परिसरात काही काळ हालचाली वाढल्या. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंदोलनाचे नेतृत्व करणारे अजिंक्य शिंदे, पक्षाचे सह-संयोजक आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह अन्य आंदोलकांना ताब्यात घेतले.https://maharashtramirror.com/ Delhi news

अभिजित दिपके यांच्यानंतर शिंदे यांनी स्वीकारली आंदोलनाची जबाबदारी
CJP चे प्रमुख अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदे सांभाळतील, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शिंदे यांनी आशुतोष रांका, सौरव दास आणि अन्य सहकाऱ्यांसह जंतरमंतरवर पोहोचून आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखत ताब्यात घेतले.

कडेकोट नाकेबंदीला चकवा देत आंदोलक जंतरमंतरवर
जंतरमंतर, संसद मार्ग आणि कनॉट प्लेस परिसरात दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. तरीही CJP चे नेते आणि कार्यकर्ते मंगळवारी सकाळी जंतरमंतरवर पोहोचले. आंदोलकांनी अचानक हजेरी लावल्याने पोलिसांची धावपळ उडाली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली.

तिरंगा हातात घेऊन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
जंतरमंतरवर दाखल झालेल्या आंदोलकांनी हातात राष्ट्रध्वज घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच मतदार यादीत पारदर्शकता आणावी, या मागणीसाठी घोषणाबाजी केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलीस व्हॅनमधून अन्य ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती आहे.

नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार
पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले, तरी आंदोलन सुरू ठेवण्यावर CJP चे कार्यकर्ते ठाम असल्याचे चित्र आहे. अभिजित दिपके यांच्यानंतर अजिंक्य शिंदे यांनी नेतृत्व स्वीकारत आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनाचे पुढील स्वरूप काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

जंतरमंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, CJP च्या नेत्यांची धरपकड आणि मतदार यादीतील पारदर्शकतेसाठी करण्यात येणारे आंदोलन यामुळे दिल्लीतील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा