Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP आक्रमक; 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा इशारा
Mumbai News :मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने आंदोलनाची भूमिका अधिक तीव्र केली आहे.
1 मिनिट वाचन

Mumbai News :मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने आंदोलनाची भूमिका अधिक तीव्र केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन केल्यानंतर आता CJPने थेट दिल्लीकडे मोर्चा वळवण्याची घोषणा केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा CJPचे नेते अभिजीत दिपके यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai news
जंतर-मंतर येथे आंदोलनास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली, तरी आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे CJPकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “पोलिसांनी आम्हाला ज्या ठिकाणी अडवले, त्या ठिकाणालाच आम्ही ‘जंतर-मंतर’ बनवून तिथेच आंदोलन करू,” असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला.https://maharashtramirror.com/ Mumbai news
दरम्यान, यापूर्वी 20 जुलै रोजी CJPकडून जंतर-मंतर येथे NEET पेपर लीकच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर कठोर कारवाई केल्याचा आरोप CJPकडून करण्यात आला होता.
आगामी आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने आणि महात्मा गांधींच्या विचारांच्या मार्गाने करण्यात येणार असल्याचेही CJPने स्पष्ट केले आहे. “आमच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकाराचा आदर करायचा की 20 जुलैच्या पोलीस कारवाईची पुनरावृत्ती करायची, हे आता केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी ठरवावे,” असे अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.
CJPच्या या घोषणेमुळे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा आता दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरच्या प्रस्तावित आंदोलनाकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




