मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed Update : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कारवाई, ठेकेदार चेतन पाटीलला अटक

• छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पहिली आरोपीला अटक करण्यात आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed Update : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कारवाई, ठेकेदार चेतन पाटीलला अटक

•छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पहिली आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टर चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक केली आहे. आज त्याला सिंधुदुर्गात आणण्यात येणार आहे. 26 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा अचानक कोसळला.

सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टर चेतन पाटील यांना अटक केली आहे. चेतनला कोल्हापुर येथून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चेतनला अटक केली आहे. आज त्याला सिंधुदुर्गात आणण्यात येणार आहे. 26 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा अचानक कोसळला.

8 महिन्यांपूर्वी 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. अवघ्या 8 महिन्यांत ही मूर्ती कोसळली. शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली. यावरून विरोधी आघाडी महाविकास आघाडीने (MVA) राज्य सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. या घटनेबद्दल मी 100 वेळा माफी मागायला तयार आहे. लवकरच शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा: Kalyan Crime News : सोने - चांदी आणि रोख रक्कमेसह 6.76 लाखांचा ऐवज घेऊन चोरटा पसार

शेअर करा